राज्यात महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना
राज्य सरकारच्या माध्यमातून दूर्बल घटकातील महिलांच्या हाताला काही काम लागावे तसेच त्यांच्या हातात पैसे यावेत यासाठी राज्यात ‘मोफत पिठाची गिरणी योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येते. यामुळे महिला घरबसल्या पिठाची गिरणीचा व्यवसाय करू शकतात.
महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांपैकी ही एक योजना आहे. महिलांना या योजनेंतर्गत 90 टक्के अनुदान देण्यात येते आणि 10 टक्के रक्कम आपल्याला भरावी लागते. महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल.
महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी खालील अटी शर्ती आहेत.
• अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी.• अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षे असणे आवश्यक आहे.• अर्जदार महिला अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असणे अनिवार्य आहे.• अर्जदार महिलेचे उत्पन्न 1 लाख 20 हजारांपेक्षा कमी असावे.• तसेच महिलेचे बँक खाते असावे.
यासाठी महिलांना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड तसेच बँक खात्याचे तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि BPL कार्ड असल्यास सरकारमान्य विक्रेत्याचे कोटेशन असणे गरजेचे आहे.