अपडेटक्राईमधुळेलाचलुचपत कारवाई

10 हजारांची लाच स्विकारतांना, महिला शिक्षण विस्तार अधिकारी अटकेत

Share this post

धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या त्यांना कमी आढळून आली होती. याबाबत वरिष्ठांना शाळेचा प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात तसेच शाळेला समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी स्वतः करिता आणि शिक्षण अधिकारी कुवर यांच्या करिता दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत, तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदे, ता.जि. धुळे येथे प्रभारी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. दि.०७.०८.२०२५ रोजी आलोसे यांनी सदर शाळेस भेट दिली असता विदयार्थ्यांची पट संख्या कमी असल्याने तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकुल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेस समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतः करीता व शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची दि.११.०८.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी स्वतःकरीता व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले होते.
त्यानंतर आज दि.१२.०८.२०२५ रोजी सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान आलोसे यांनी पंचायत समिती, धुळे कार्यालयातील त्यांचे कक्षात सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडुन स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द भ्र.प्रति.अधि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *