अपडेटऑटो

FASTag संदर्भात नवा नियम, नाहीतर आकाराला जाईल दुप्पट टोल

Share this post

टोल नाक्यावर टोल आकारणी करण्यासाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. NHAI भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने फास्टॅग संदर्भात नवीन अशी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार फास्टॅग खिशात ठेवणं किंवा गाडीच्या इतर कोणत्याही (Toll Tax) भागावर चिटकवल्यास कारवाई केली जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार विंडशिल्डवर व्यवस्थितपणे फास्टॅग लावले नाही तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.

फास्टॅग विंडशिल्ड व्यतिरिक्त इतर कुठेही चिटकवला तर स्कॅनिंग करण्यासाठी समस्या निर्माण होते आणि ज्या कारणासाठी फास्टॅग ची सोय आणली आहे म्हणजेच वेळ वाचवण्यासाठी फास्टट्रॅक ची सोय आणली आहे इथे वेळ वाया जात असल्यामुळे इतर वाहनांना (Toll Tax) थांबावे लागते आणि हीच गोष्ट टाळण्यासाठी प्राधिकरण दुप्पट टोल वसुली करणार आहे.

गाडीच्या समोरच्या विंडशिल्ड वर फास्टॅग चिटकवलेले नसल्यास दुप्पट शुल्क वसुलीसाठी NHAI ने सर्व वापरकर्ता , शुल्क संकलन संस्थांना मानक प्रणाली (एसओपी )जारी केला आहे.

याशिवाय सर्व टोल (Toll Tax) नाक्यांवर महामार्ग वापर करताना समोरच्या विंडशिल्ड वेळ निश्चित फास्टॅग शिवाय टोल लेनमध्ये प्रवेश केल्याबद्दल दंडा बद्दल माहिती दिली जाईल. याशिवाय विंडशिल्ड वर व्यवस्थित न लावलेल्या फास्टॅग प्रकरणांची नोंद त्या गाड्यांच्या वाहन नोंदणी क्रमांक सोबत केली जाणार आहे. त्यामुळे आकारले जाणारे शुल्क आणि टोल लेन (Toll Tax) मध्ये वाहनाची उपस्थिती याबाबतही रेकॉर्ड ठेवण्यास मदत होणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *