भारतीय पोस्ट खात्यांना मोठा निर्णय, पिनकोड ऐवजी आता डीजीपीन
भारतीय पोस्ट खात्यांना मोठा निर्णय घेऊन पिनकोड ऐवजी आता डीजीपीन पद्धत लागू केले, एखाद्या पत्त्याच्या नेमक्या ठिकाणाचा डीजीपीन उपलब्ध होणार आहे.10 अंकी डीजिपीन मुळे एखादा ठिकाण नेमकं शोधून काढणं सोपं होईल दुर्गम भागात ग्रामीण भागात पत्ता शोधण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल तसेच आपातकालीन सुविधाना म्हणजे अग्निशिमनमुळे नेमक्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणे शक्य होईल.
डीजीपीन ने भारतातील कोणत्याही ठिकाणाला एक युनिक डिजिटल ओळख मिळते संपूर्ण पत्त्याचा अचूक ठिकाण दर्शवतो पिनकोड आणि डिजीपीन मधला फरक काय तर पिन कोड हा सहा अंकी नंबर आहे जो मोठ्या परिसरांचे शहराचे जिल्ह्याचे आणि गावाची ओळख सांगतो. पिनकोड मुळे कुरिअर तुमच्या परिसरात पोहोचेल मात्र डीजीपीन मुळे कुरिअर थेट तुमच्या दारापर्यंत पोहोचते.
टपाल विभागांना नवी डिजीपिन प्रणाली सुरू केलेली आहे. 10 अंकी डीजीपीन आता तुमचं शहर गाव आणि घरचा अचूक पत्ता सांगणार आहे युजरला अधिकृत संकेतस्थळावरून ते मिळवता येणार आहेत आपत्कालीन मदत असो की ऑनलाईन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्यात यासाठी टपाल विभागाने आता तेदहा अंकी डीजीपीन प्रणाली सुरू केलेली आहे. यामुळे एखाद्या ठिकाणाची अचूक ओळख करता येणारे देशातील प्रत्येक ठिकाणाचा या दहा अंकी पिन मुळे आता अचूक पत्ता मिळणार आहे युजरला इंडिया पोस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन आणि माय डीजीपीन या संकेतस्थळावरून आपला डीजीपी मिळवता येईल नव्या प्रणालीमुळे टपाल विभाग गाव जंगल किंवा समुद्रकिनाऱ्यापर्यंत ही अचूक ठिकाणी पोहोचू शकते ही संकल्पना संपूर्ण देशाच्या क्षेत्राला चार बाय चार मीटर आकारामध्ये राहते.
तुमच्या घरासाठी DIGIPIN कसा तयार करायचा ?
प्रथम dac.indiapost.gov.in/mydigipin/home या वेबसाइटवर जावे. नंतर वेब ब्राउझरला तुमचा लोकेशन अॅक्सेस द्यावा लागेल. DIGIPIN च्या गोपनीयता धोरणाला सहमती द्यावी लागेल. पुढे तुम्ही तुमच्या लोकेशनवर क्लिक करताच, तुम्हाला तुमचा युनिक अल्फान्यूमेरिक कोड दिसेल.
अधिक माहितीसाठी भारतीय पोस्ट खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.