अपडेटराष्ट्रीयशैक्षणिक

इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार अपार आयडी

Share this post

केंद्र सरकारने देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आयडी देण्यासाठी राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. यानुसार राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी देण्यात येणार आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्याने U-DISE प्रणालीद्वारे Apar ID प्रदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आर.विमला यांनी दिलेल्या सूचनेनुसार, केंद्र सरकारने राज्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची माहिती दिली असून त्याची सुविधा U-DISE सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपार आयडी देण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. अपार आयडी तयार करण्याबाबत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व संगणक प्रोग्रामर व तालुक्याच्या एमआयएस समन्वयकांना व शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आधार कार्डवर जसा 12 अंकी नंबर असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचाही युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे. वन नेशन वन स्टुडंटअंतर्गत हा अपार आयडी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. या युनिक आयडीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजीटल स्वरुपात स्टोअर होण्यास मदत होणारे. बरेच विद्यार्थी शाळा बदलतात अशावेळी अपार नंबरमुळे विद्यार्थ्यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. हा अपार आयडी डीजी लॉकरलासुद्धा जोडला जाणार आहे. अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवण्यास मदत होणार आहे. याचा फायदा उच्च शिक्षणासाठीही होणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *