अपडेटइतरदुर्घटनाराष्ट्रीय

Amazon च्या पार्सलमध्ये आढळला विषारी साप

Share this post

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्समुळे घरबसल्या आवडत्या वस्तूची निवड करणे आणि ती खरेदी करणे फार सोपे झाले आहे. यामध्ये Amazon ही शॉपिंग साईट टॉपमध्ये आहे. अमॅझॉनवर अनेक ग्राहक नियमित शॉपिंग करत असतात. मात्र, नुकताच एका दाम्पत्याला अमॅझॉनवर खरेदी केल्याचा पश्चाताप झाला असेल. या दाम्पत्याला आलेला भीतीदायक अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बंगळुरुत राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर दाम्पत्याने Amazon वर एक्स बॉक्स कंट्रोलर खरेदी केला होता. ज्याचं पार्सल घरी येताच त्यांनी खोललं आणि त्यांना घाम फुटला. कारण या पार्सलमधून चक्क जिवंत विषारी साप बाहेर आला. ज्याला पाहताच या दाम्पत्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली. विशेष म्हणजे, या बॉक्समधून बाहेर आलेला साप हा कोब्रा जातीचा (Cobra Snake) होता. सुदैवाने हा विषारी साप पॅकिंगच्या टेपमध्ये अडकला होता आणि त्यामुळे दाम्पत्य सुखरूप आहे.

हा धक्कादायक प्रकार सर्वांसमोर उघड करण्यासाठी बंगळुरुतल्या या सॉफ्टवेअर इंजिनिअर कपलने एक व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलंय की, ‘आम्ही Amazon वरुन एक्सबॉक्स कंट्रोलर मागवला होता. त्या बॉक्समध्ये जिवंत साप होता. Amazon च्या डिलिव्हरी बॉयने हा बॉक्स आमच्या हातात दिला नाही तर तो आमच्या घराबाहेर हा बॉक्स ठेवून गेला होता. आम्ही बंगळुरुतल्या सराजपूर रोड या ठिकाणी असलेल्या इमारतीत राहतो. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसंच प्रत्यक्षदर्शीही आहेत, ज्यांनी आम्हाला याबाबत सांगितलं असं या दाम्पत्याने व्हिडीओत म्हटलं आहे’.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *