अपडेटनोकरी/उद्योगमुंबई

BMC मध्ये 690 अभियंता पदांची भरती प्रक्रिया जाहीर

Share this post

मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडून 690 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता(स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या चार पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण 250 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट क मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 41800-132300 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 250 जागांपैकी 24 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 37 अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 8, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 5, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 4 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 4, ओबीसी 35, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 25, ईडब्ल्यूएससाठी 22 आणि खुल्या प्रवर्गासाठी 84 जागा आहेत.

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाच्या एकूण 130 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट क मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 41800-132300 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 130 जागांपैकी 12 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 10 अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 1, भटक्या जमाती (ब) साठी 3, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 5, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 2 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 2, ओबीसी 20, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 13, ईडब्ल्यूएससाठी 18 आणि खुल्या प्रवर्गासाठी 44 जागा आहेत.

दुय्यम अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण 233 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट ब मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 44900-142400 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 233 जागांपैकी 22 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 14 जागा अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 4, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 8, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 6 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 7, ओबीसी 47, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 23, ईडब्ल्यूएससाठी 23 आणि खुल्या प्रवर्गासाठी 77 जागा आहेत.

मुंबई महापालिकेतील अभियंता पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी 11 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. याभरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात उमेदवारांना 11 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल. या भरती प्रक्रियेसंर्भातील अधिक माहिती देखील 11 नोव्हेंबरला उपलब्ध होईल.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *