अपडेटक्राईमशैक्षणिक

पूजा खेडकर यांचे, IAS पद रद्द व भविष्यात UPSC च्या सर्व परीक्षा देण्यास मनाई

Share this post

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मोठा दणका मिळाला आहे. UPSCने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी चुकीचा माहिती आणि प्रमाणपत्राच्या आधारावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करून परीक्षा पास केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात आयोगाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता.

यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या २००९ ते २०२३ या काळातील सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई केली आहे. खेडकर यांना नागरी सेवा परीक्षा नियम २०२२ नुसार दोषी ठरवण्यात आले आहे.

पूजा खेडकर यांच्या उमेदवारीबाबत UPSC नं केलेल्या कारवाईबाबत एएनआयनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माहिती दिली आहे. ‘यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना देण्यात आलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच, यापुढील काळात यूपीएससीकडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा त्यांना कधीच देता येणार नाही, असं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे’, अशी माहिती एएनआयच्या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *