अपडेटअहमदनगरक्राईमशैक्षणिक

शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने सोसायटी रक्कम कपात,संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापिका दोघांवर गुन्हा दाखल

Share this post

श्रीरामपूर येथील एज्युकेशन सोसायटी संचलित सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची रक्कम कपात दर्शवून शिक्षिकेची तब्बल पावणेदोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

सहशिक्षिका सुनंदा बारकू शेळके यांच्या पगारासह वेतन श्रेणीतील फरक बँक खात्यावर जमा होण्यासाठी एकूण बिल रक्कम २.७ लाख २३० रूपये मुख्याध्यापिका संगिता पवार यांनी मंजूरीसाठी पाठवली होती.

बील मंजूर होवून शेळके यांच्या खात्यामध्ये रक्कम २६ एप्रिल २०२३ रोजी जमा झाली, मात्र यापैकी १. ७ लाख २३० रूपये कर्ज घेतले नसताना मुख्याध्यापिका पवार यांनी वेतनश्रेणी खर्च बिलामध्ये कर्ज असल्याचे दाखवून रक्कम शाळेच्या बँक खात्यावर जमा करुन, रकमेचा अपहार केला.

तसेच ६८ हजार ४०० रुपये सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२३ यादरम्यान सोसायटीची कपात दर्शवून अपहार केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सुनंदा शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापिका यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक मगरे करीत आहेत. या घटनेने शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *