राष्ट्रपती भवनाकडून नवनियुक्त राज्यपालांची यादी जाहीर
सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लक्ष्मणप्रसाद आचार्य यांच्याकडे मणिपूरचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.
गुलाबचंद कटारिया यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. कटारिया यांची जागा आचार्य यांनी घेतली आहे.
कटारिया यांची केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ओम प्रकाश माथूर हे सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रामेन डेका यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
सीएच विजयशंकर यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
कैलाशनाथन यांची पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सर्व नियुक्त्या पदभार स्वीकारल्यापासून लागू होतील.