गटविकास अधिकाऱ्यासह सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात,नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कार्यवाही
अंगणवाडी बांधकामाचा बिलाच्या रकमेसाठी 26 हजारांची लाच स्वीकारतांना अक्कलकुवा पंचायत समिती गट विकास अधिकारी सह सहाय्यक लेखाधिकारी हे रंगेहाथ पकडण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे की तक्रारदाराने अक्कलकुवा व डाब ग्रामपंचायत अंतर्गत तीन अंगणवाडी चे बांधकाम पूर्ण केले होते. बांधकाम बिलाची रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतु तक्रारदार यांच्या बिलाची रक्कम खात्यावर वर्ग झाली नाही. यामुळे तक्रारदाराकडून यांच्या बिलाची रक्कम खात्यावर वर्ग झाली नाही म्हणून बिल काढून देण्यासाठी 26 हजारांची मागणी त्यांच्याकडून केली. तक्रारदाराकडून सोळा हजार रुपये स्वीकारताना अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे तसेच सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे यांना आठ हजार रुपयांची रोकड घेताना लाच लुचपत प्रतिबंधक च्या पथकाने रंगेहात पकडले.
नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश चौधरी यांनी सापळा लावून दोघांना रंगेहाथ पकडले. सदर कार्यवाही पोलीस हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, पोलीस नाईक देवराम गावित, हेमंत कुमार महाले, सुभाष पावरा, जितेंद्र महाले, यांनी सदर कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. या लाच प्रकरणी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.