अपडेटमनोरंजनराजकारण

नवनिर्वचित खासदार आणि बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला कानशिलात लगावली

Share this post

नवनिर्वचित खासदार आणि बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्यासोबत खळबळजनक घटना घडली आहे. चंदीगडवरून दिल्लीला जाण्यासाठी कंगना ही विमानतळावर पोहचली होती. यावेळी चक्क सीआयएसएफ गार्ड महिलेने तिच्या कानाखाली लावली.

चंदीगढच्या विमानतळावर कंगनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर काहीतरी बोलल्याने तेथील महिला CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावल्याने त्याची मोठी चर्चा झाली आहे. अखेर या महिला जवानला अटक करण्यात आली आहे. कंगना रणौत दिल्लीत पोहोचली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिने सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह यांना या घटनेची माहिती दिली आहे. कंगनाने दावा केला आहे की, कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने तिच्याशी वाद घातला आणि चंदीगड विमानतळावर पडद्याच्या भागात तिला थप्पड मारली. कॉन्स्टेबल कुलविंदरला सीओ रूममध्ये ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

या सर्व प्रकारानंतर आता कंगना राणावत हिने एक व्हिडीओत म्हणाली की, नमस्कार सर्वांना..मला अनेक फोन येत आहेत. माझ्या जवळच्या व्यक्तींचे आणि मीडियाचे पण. पुढे कंगना राणावत म्हणाली की, सर्वात पहिले म्हणजे मी सुरक्षित आहे. आज जी घटना घडली ती, चंदीगड विमानतळावर सेक्युरिटी चेक वेळी घडली. मी सेक्युरिटी चेक करून निघत होते.

त्याचवेळी दुसऱ्या कॅबिनमध्ये असलेली सुरक्षारक्षक सीआयएसएफ गार्ड महिला माझ्याकडे आली आणि तिने माझ्या कानाखाली मारली, त्यानंतर तिने शिवीगाळ करण्यासही सुरूवात केली. त्यानंतर मी तिला विचारले की, तिने असे का केले तर ती शेतकरी आंदोलनाला समर्थन करते म्हणाली. मी सुरक्षित आहे, परंतू पंजाबमध्ये जो दहशतवाद आणि उग्रवाद कसा हाताळायचा ही माझी चिंता आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *