अपडेटसोलापुर

सोलापूर विद्यापाठात ५० गुणांच्या पेपरला विद्यार्थ्याला पडले ९९ गुण…

Share this post

सोलापूरच्या पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापाठात घडलाय. विद्यापाठ परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. बीएसस्सी सेमिस्टर तीनच्या (B.Sc. 3rd Semester) निकालात ५० गुणांची परीक्षा असताना विद्यार्थांना चक्क ९९ गुण मिळाले असल्याचा अजब प्रकार घडला आहे. यामुळे विद्यार्थी देखील गोंधळून गेला आहेत.

सोलापूर विद्यापीठातर्फे १३ ते २२ डिसेंबर दरम्यान बीएसस्सीच्या तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षा पार पडल्या. त्याचे निकाल ५ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले.यामुळे अनेक विद्यार्थी गोंधळलेले दिसून आले.

परीक्षा ५० गुणांची असताना काही विद्यार्थ्यांना ५० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यामध्ये ४० गुणांची लेखी परीक्षा व १० गुण असाइमेंट अशी एकूण ५० गुणांची परीक्षा घेतली गेली. मात्र, प्रत्यक्षात काही वेगळेच घडल्याने विद्यार्थी गोंधळले आहेत.

दरम्यान, विद्यापीठाकडून याबाब स्पष्टीकरण देण्यात आले आहे. काही कलेरिकल चुकीमुळे हे घडले असल्याचे सांगण्यात आले आहे. क्लरीकल चुकीमुळे केवळ चार विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असल्याची कबुली विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना झालेल्या चुका दुरुस्त करुन त्या बदलून दिल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *