अपडेटजळगाव

चाळीसगावमध्ये माजी नगरसेवकावर गोळीबार…

Share this post

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या भागात ही घटना घडली आहे. या गोळीबारात माजी नगरसेवक महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या चाळीसावात माजी नगरसेवकारवर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगावातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला आहे. माजी नगरसेवक महेंद्र मोरे कार्यालयात बसले होते. त्याचवेळी चार ते पाच अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून मोरे यांच्यावर गोळीबार केला आहे. गोळीबारानंतर पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कार मधून आलेल्या पाचच्या संख्येने असलेल्या बंदूकधारी तरुणांनी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळासाहेब मोरे यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यांना एकूण चार गोळ्या लागल्या त्यात एक उजव्या खांद्यावर दुसरी मांडीवर आणि दोन गोळ्या पायावर लागल्याची हाती आली आहे त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलं आहे.घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी तिकडे धाव घेतले जखमी बाळासाहेब मोरे यांना डॉ. जयवंत देवरे यांच्या रुग्णालयात दाखल करणयात आलं तेथे प्रथमोपचार करून नंतर त्यांना पुढील उपचार करण्यासाठी नाशिककडे हकवण्यात आलं आहे.

पोलीस अधीक्षक जळगाव यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांच्या बरोबर जळगाव जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अप्पर पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी देखील उपस्थित होते गोळीबार करून फरार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असून रुमाल बांधून कार मधुन उतरलेली 5 आरोपी cctv मध्ये कैद झाल्याने त्या वर्णनाचा आधार घेऊन पोलीस लवकरच आरोपीपर्यत पोहचतील असा आत्मविश्वास वर्तवला जात आहे दरम्यान भरदिवसा झालेल्या या प्रकाराने चाळीसगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले असून शहराच्या कायदा सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

या गोळीबारात मोरे थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. गोळीबार का केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *