अपडेटनोकरी/उद्योग

भारतीय रेल्वेत ९००० जागांसाठी पदभरती…

Share this post

भारतीय रेल्वेने तरुणांसाठी भरतीच्या अधिसूचना जारी केल्या आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने टेक्निशियन पदांसाठी बंपर भरती जारी केली आहे.

रेल्वेच्या टेक्निशियन पदासाठी एकूण ९००० जागा रिक्त आहेत. अधिसूचनेनुसार फेब्रुवारीमध्ये भरती जारी केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून सुरु होईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने भारतीय रेल्वेच्या अधिकृतसंकतस्थळावर indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराचे किमान वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३३ वर्षांपेक्षा जास्त नको.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला कम्प्युटर बेस आधारित चाचणी द्यावी लागेल. उमेदवाराला CBT1 मध्ये उत्तीर्ण झालेल्या CBT2 परीक्षेत सहभागी होता येईल. CBT2 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल. सर्व टप्प्यांत यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांना गुणवत्ता यादीत स्थान मिळेल.

या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण १० वी उत्तीर्ण असायला हवे. तसेच उमेदवराने ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त २५० रुपये शुल्क भरावे लागेल.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *