अपडेटमनोरंजनविशेष

हा ठरला बिगबॉस १७ चा महाविजेता…

Share this post

बिग बॉस १७ च्या टॉप ५ मध्ये मुनावर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे हे फायनलमध्ये पोहोचले होते. मात्र मन्नारा व अंकिताने निराशा केली आणि घरातल्या सर्व स्पर्धकांवर मात करत मुनावरने बाजी मारली. काल बिग बॉस-१७ या सीझनचा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. मुनावरचा काल वाढदिवसही होता. महाविजेते पद पटकावल्याने त्याचा वाढदिवस त्याच्यासाठी अत्यंत खास ठरला आहे. सलमान खानने (Salman Khan) मुनावर फारुकीला बिग बॉस-१७ या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे.

मुनावर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. तो विविध शहरांमध्ये जाऊन स्टँडअप कॉमेडी करतो. मुनावर त्याच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. लॉक-अप या शोमुळे मुनावरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. ७० दिवस मुनावर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता. हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनावरला ट्रॉफी, २० लाख रुपयांचे रोख पारितोषिक व एक कार मिळाली. तसेच त्याला इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली होती.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *