अपडेटक्राईमतंत्रज्ञान

भगवान श्री रामाच्या नावाने लोकांची बँक खाती रिकामे करण्याचा प्रयत्न,सावध रहा…

Share this post

22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात देशभरातून लाखो भाविक सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांसह अनेक व्हीआयपीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अशा परिस्थितीत सायबर भामटे देखील सक्रिय झाले आहेत, जे भगवान श्री रामाच्या नावाने लोकांची बँक खाती रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे सायबर भामटे लोकांना व्हॉट्सॲप वर संदेश पाठवत, भगवान श्रीरामाच्या आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव झाला आहे. त्यामुळे राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात तुम्हाला व्हीआयपी एंट्री मिळू शकते. अश्या आशयाचे मेसेज पाठवत आहे.

या संदेशासोबत एक लिंक पाठवली जात आहे. या लिंकवर जाऊन हे ॲप इन्स्टॉल करा आणि मोफत व्हीआयपी पास मिळवा, असे संदेशात म्हटले आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर समजून घ्या की एक फसवणूक संदेश आहे आणि तुमची फसवणूक करू शकतो.

या लिंकवर क्लिक करून आणि काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात व्हीआयपी एंट्री मिळवू शकता, असे आमिष दाखवून फसवणूक करू शकतात.

पण आम्ही तुम्हाला सांगतो, या लिंक्स केवळ बनावट आहेत, या लिंक द्वारे तुमच्या स्मार्टफोनवर Any Desk आणि Teamviewer सारखे ॲप इन्स्टॉल करू शकतात, या माध्मातून तुमच्या डिव्हाइसची माहिती सायबर भामटे घेऊन तुम्हाला लूबाडू शकतात.

सरकार किंवा मंदिर प्रशासनाने सर्वसामान्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या व्हीआयपी पासची व्यवस्था किंवा कोणतेही ॲप तयार केलेले नाही. त्यामुळे फेक लिंक मेसेज पासून सावधान रहा.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *