अपडेटआरोग्य

कोरोनाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, पंचसूत्रीचे पालन करा, आरोग्य विभागाचं आवाहन…

Share this post

कोरोनाच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी पंचसूत्रीचे पालन करावं, असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे. आवश्यकतेनुसार मास्क वापरा, वारंवार हात साबणानं धुवा, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे सुरक्षित अंतर असावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा आणि चुकीची माहिती इतरांना देऊ नका तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

खबरदारी घेतली तर घाबरण्यासारखं काहीच नाही. संशय वाटल्यास कोरोनासंबंधीची चाचणी स्वत:हून करून घ्यावी, असंही आरोग्य विभागानं म्हटलं आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरूच असून आजारी रूग्णांवर तातडीने उपचार देखील केले जात आहेत. नागरिकांना काहीही शंका असेल किंवा अधिक माहिती हवी असेल त्यांनी १०४ या टोल फ्री क्रमांकाच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा. राज्याच्या आरोग्य विभागाच्या तयारी विषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यात आज अकराशेहून अधिक चाचण्यांमधून कोरोनाच्या २८ रुग्णांचं निदान झालं आणि १३ रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात १६८ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातले १०० हून अधिक मुंबई महानगर क्षेत्रात आहेत. कोरोनाच्या JN1 प्रकारच्या एकूण १० रुग्णांची नोंद राज्यात आतापर्यंत झाली आहे. हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणातच बरे झाले आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *