अपडेटमनोरंजन

‘ तुझसे नाराज नहीं जिंदगी ‘ या गाण्याचे सिंगर अनुप घोषाल यांचे निधन..

Share this post

1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मासूम’ या चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.

या गाण्याला आवाज देणारे गायक अनूप घोषाल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी अनूप घोषाल यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे अनुप गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होते.शुक्रवारी दुपारी 1.40 वाजता त्यांचे निधन झाले.

अनूप यांनी वयाच्या 4 थ्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. जेव्हा चे 19 वर्षांचे झाले तेव्हा सत्यजीत रे यांची नजर त्यांच्यावर पडली. ‘गूपी गेन बाघा बेन’ मध्ये काम केलं. सत्यजीत रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनूप घोषाल यांना गायनात राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवला होता. त्यांनी आजवर बंगाली, हिंदी, भोजपुरी आणि असमिया भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत.

अनूप घोषाल यांनी हिंदीत ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘जिनके हृदय श्रीराम बसे’, ‘मन के मंदिर में’, ‘गुरु बिन’, ‘अंखिया हरिदर्शन को प्यारी’, ‘मोहे लागी लगन’ पासून ‘मधुर अमर’ पर्यंत अनेक गाण्यांना आवाज दिला होता.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *