मनोरंजनअपडेटउत्तर महाराष्ट्रमहाराष्ट्र

कोपरगावच्या गौरीने जिंकले सा रे ग म प लिटिल चॅम्पस् चे विजेतेपद…

Share this post

झी मराठी वरील गायनाचा कार्यक्रम सा रे ग म प लिटिल चॅम्पस् चा या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात गौरी पगारे सा रे ग म प लिटिल चॅम्पस पर्वाची महविजेती झालीय.

सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला विजेती म्हणून घोषित करण्यात आलं. गौरी मूळची कोपरगावची असून अत्यंत नाजूक परिस्थितीतून लहान वयातच तिने गायिका होण्याचं स्वप्न पाहिलं.

गौरीने सा रे ग म प लिटिल चॅम्पसच्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरल आहे. गौरी शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. गौरी सा रे ग म प लिटिल चॅम्पस महाअंतिम सोहळ्याची विजेती झाल्याने महाराष्ट्रातील जनता तिचं अभिनंदन करत आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *