80 वर्षे पूर्ण केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या रक्कमेमध्ये 20 ते 100 टक्क्यापर्यंत वाढ…
राज्य शासकीय, निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या आणि वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात म्हणजेच पेन्शनच्या रकमेमध्ये 20 ते 100 टक्क्यापर्यंत निवृत्तिवेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णायाचा लाभ 75 हजार निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शासन निर्णयानुसार हा बदल 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या पेन्शन योजनेप्रमाणं राज्यातील 80 वर्षांवरील निवृत्तिवेतनधारकांना वाढीव निवृत्तिवेतन मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.
राज्य शासकीय आणि जिल्हा परिषद, मान्यता तसंच अनुदानाप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठं त्यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालयं, पंचायत समिती, कृषी विद्यापीठांमधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या निवृत्तिवेतनधारकांना आणि कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांना हा शासन निर्णय लागू असेल.
100 वर्षे किंवा त्याहून अधिक वय – 100 टक्के निवृत्तीवेतनवाढ
95 ते 100 वर्षे – 50 टक्के निवृत्तीवेतनवाढ
90 ते 95 वर्षे – 40 टक्के निवृत्तीवेतनवाढ
85 ते 90 वर्षे वय – 30 टक्के निवृत्तीवेतनवाढ
80 ते 85 वर्षे वय – 20 टक्के निवृत्तीवेतनवाढ
