अपडेटराष्ट्रीय

70 वर्षांवरील सर्वांसाठी 5 लाखांपर्यंत फ्री उपचार,केंद्र सरकारचा निर्णय

Share this post

केंद्रातील सरकारने एक निर्णय घेतला आहे. आता ७० वर्षांवरील सर्व वृद्धांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळेल.

पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ७० वर्षाच्या वरील वृद्धांना उपचाराचा खर्च या योजनेच्या माध्यमातूनच केला जाईल.

सरकारने सांगितल्यानुसार, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचा समावेश केला जाईल. यामुळे जवळपास 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल आणि ६ कोटी वृद्ध नागरिकांना ५ लाखांपर्यंत फ्री उपचार मिळेल. यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन स्वतंत्र कार्ड दिले जाईल. जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. जी कुटुंबे सध्या आयुष्मान भारत योजनेत नाहीत. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा त्यात समावेश केला जाईल आणि त्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांचे शेयर्ड कव्हर मिळेल.

७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक जे आधीच केंद्र सरकारच्या आरोग्य योजना , माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना , आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल इत्यादी इतर सार्वजनिक आरोग्य विमा योजनांचा लाभ घेत आहेत. त्यांना एकतर त्यांची आधीची योजना निवडावी लागेल किंवा आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची निवड करू शकता.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *