39 हजार जागांसाठी, कॉन्स्टेबल आणि रायफलमन पदांसाठी भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशनने कॉन्स्टेबल आणि रायफलमन या पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. आयोगाने BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, आसाम रायफल्स, SSF, NCB मध्ये कॉन्स्टेबलच्या एकूण 39 हजार 481 रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत.
सदर भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सदर परीक्षा हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, अशा 13 भाषांमध्ये घेतली जाईल. ही परीक्षा संगणक आधारित असेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2024 असून सदर परीक्षा (Exam) जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आयोगाच्या https://ssc.gov.in./ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. यात स्वतःची नोंदणी करण्यासाठी संबंधित बटणावर क्लिक करा. तुम्ही एसएससी वेबसाइटवर आधीच नोंदणीकृत असल्यास, तुमच्या लॉगिन क्रेडेंशियल्सच्या मदतीने लॉग इन करा. नोंदणी करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. नंतर अर्जाची एक प्रत डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून घ्या.