अपडेटराष्ट्रीय

30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ व इतर लाभ

Share this post

रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या तारखेनुसार 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी तीन टक्के वार्षिक वेतनवाढीचा लाभ देते आतापर्यंत 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षभर काम करूनही 1 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळत नव्हता.

न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या आधारे 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ देण्याचे आदेश मंडळाने सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना दिले आहेत. वेतनवाढ मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना वाढीव मूळ आधारावर पेन्शन, ग्रॅच्युइटी, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता आणि इतर भत्तेही मिळतील.

रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार 30 जून रोजी निवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार आहे. त्याचप्रमाणे तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले कर्मचारीही यावर दावा करू शकतात. आणि त्यांना देखील थकबाकी मिळणार आहे. वेतनवाढीमूळे कर्मचाऱ्यांना आता मूळ पेन्शन, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, तसेच इतर भत्तेही वाढीव मिळणार आहेत. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (वेतन आयोग) संदीप पाल यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आता अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही 1 जुलै रोजी वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *