अपडेटतंत्रज्ञानमहाराष्ट्रराष्ट्रीय

14 डिसेंबरच्या आधी अपडेट करा तुमचं आधार कार्ड…

Share this post

आपल्या देशात आधार कार्ड हे महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. अनेक सरकारी तसेच बाह्य कामांसाठी इतर कोणत्याही कागदपत्रांपेक्षा आधार कार्ड हेच सर्वात महत्वाचं आहे.

त्यामुळे वेळोवेळी आधार कार्ड अपडेट करण गरजेचं आहे. जुन्या आधार कार्डमुळे ऑनलाईन फसवणूकीची भीती असते त्यामुळे भारत सरकारकडून आता 10 वर्ष जुन्या आधार कार्डनां अपडेट करवून घेण्याचा आदेश जारी केला आहे.आधार कार्डवरूनच तुमची अनेक सरकारी तसेच इतर कामं पूर्ण होत असतात. एखाद्या माणसाची ओळख पटण्यासाठी हे कागदपत्र सगळ्याच ठिकाणी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे भारत सरकारकडून जारी केलेल्या या आधार कार्डला वेळेतच अपडेट करून घ्या. तुमचे किंवा घरात कुणाचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर वेळेतच अपडेट करून घ्या.सध्या सरकार हे काम मोफत करवून देत आहे, तर या मोफत योजनेचा वेळेतच लाभ घ्या.

10 वर्ष जुनं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI या अधिकृत साईटला भेट द्या. सर्व सरकारी प्रक्रियेसाठी इथे कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही. याआधी UIDAI च्या मदतीने डेमोग्राफिक डेटा, बायोमेट्रिक अपडेट, आधार डाउनलोड यांसारख्या प्रक्रीयेंवर काही प्रमाणात शुल्क आकारले जायचे.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी CSC केंद्राला भेट देऊन आधार कार्ड अपडेट करून घेणं कधीही सोयीस्कर ठरेल. कारण ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करून जास्तीत जास्त तुम्ही एक अपोईनमेंट बुक करू शकता. आधार कार्ड हा खरोखरच एक महत्वाचा दस्ताऐवज असल्यामुळे या कामात उशीर करू नका वेळीच अपडेट करून घ्या.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *