12 वर्षांनंतर हनी सिंगचा घटस्फोट…
हनी सिंगने त्याच्या पत्नीपासून 12 वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे.
दिल्लीतील न्यायलयाने मंगळवारी दोघांचा घटस्फोट मंजूर केला. गेल्या अडीच वर्षांपासून हे प्रकरण न्यायलयात सुरु होते अखेर निर्णय झाला.

रॅपर हनी सिंगवर 2021 मध्ये पत्नी शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यादरम्यान पत्नीने त्याच्या कुटुंबावरही अनेक आरोप केले होते, ज्यामध्ये मानसिक आणि शारीरिक छळाचाही आरोप होता. याशिवाय हनी सिंगने तिची फसवणूक केली असून पैशांबाबतही फसवणूक केल्याचे शालिनीने तक्रारीत म्हटले होते.
हनी सिंग आणि शालिनी तलवार एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. दोघेही शाळेपासून एकमेकांना डेट करायचे. 20 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2011 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाची बातमी कुणालाही माहिती नव्हती. याचा खुलासा खुद्द हनी सिंगने एका रिअॅलिटी शोदरम्यान केला होता. दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले होते, परंतु 2021 मध्ये शालिनीने अचानक हनीवर मारहाणीचा आरोप केला. आता 2023 मध्ये कोर्टाने दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.
