अपडेटऑटोमहाराष्ट्रराष्ट्रीय

1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात नवीन नियम लागू…

Share this post

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी बरीच प्रोसेस करावी लागते. यामध्ये वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेत हमखास 1 आठवडा तर नक्कीच निघून जातो. परंतु आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे. कारण की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात मोठे बदल केले आहेत. या नियमानुसार, आता RTO कार्यालयात जाऊन व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज पडणार नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, खाजगी संस्थांना चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात. हा नियम येत्या 1 जून 2024 पासून लागू होणार आहे. या नव्या नियमानुसार, वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर चालकाला एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. तसेच एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला 25 हजार रुपये दंड भरावा लागेल.

ज्या व्यक्तीचे वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल. या नियमानुसार वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही. यासह खाजगी दुचाकी वाहन चालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असायला हवी. तर मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे दोन एकर जमीन असायला हवी. याबरोबर वाहन चालकाच्या चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे असायला हव्यात.

प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षकांकडे हायस्कूल डिप्लोमा गरजेचे असेल. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबधित सर्व माहिती असायला हवी. या सर्व बाबी तपासूनच प्रशिक्षकाची निवड केली जाणार आहे. असे नियम 1 जून 2024 पासून लागू होणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *