५ कोटी ८५ लाखाची बेहिशोबी संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमा केल्याने सोलापूरच्या लाचखोर शिक्षणाधिकारीवर अखेर गुन्हा दाखल…
सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. दरम्यान बेहिशोबी संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमा केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अखेर लोहार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. या कारवाईनंतर जि.प.कडून पाठविण्यात आलेल्या अहवालानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.या ACB कडून प्रकरणी किरण लोहार यांची खुली चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर कोट्यावधी रुपयांचे घबाड जमवल्या प्रकरणी किरण लोहार यांच्यासह पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
किरण लोहार यांच्याकडे तब्बल ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची बेहिशोबी संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमा केल्याचे समोर आले. १९९३ पासून शासकीय सेवक असताना किरण लोहार यांनी घबाड जमवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने स्वतः लोहार व त्यांच्या पत्नी सुजाता आणि मुलगा निखिल विरोधात देखील बेहिशोबी मालमत्ता जमविण्यामध्ये सहाय्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
