अपडेटराजकारण

४ राज्यांमध्ये कोणाचे सरकार येणार ? आज मतमोजणी

Share this post

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांची मतमोजणी सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे.

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज म्हणजेच रविवारी जाहीर होणार आहे. या निवडणुकांकडे मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे विजयासाठी भाजपसह काँग्रेसने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांच्यासह १ हजार ८६२ उमेदवारांच्या भवितव्यचा फैसला आज होणार आहे.१९९३ पासून कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा राज्यात सरकार स्थापन करता आलेलं नाही. राज्यात आळीपाळीने कधी भाजप तर कधी काँग्रेसचं सरकार आलं आहे. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजय झाला होता. आता काँग्रेस सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्यात यशस्वी होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या २३० जागांसाठी २५३३ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत सर्वच दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने शिवराज सिंह यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवली आहे. तर काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली आहे.

तेलंगणात विधानसभेच्या ११९ जागांसाठी भाजप, काँग्रेस आणि बीआरएस पक्षात तिरंगी सामना रंगला आहे. त्यामुळे याठिकाणी कोणता पक्ष सत्ता काबिज करण्यात यशस्वी होतो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. २०१८ साली तेलंगणात बीआरस पक्षाने सत्ता स्थापन केली होती.

छत्तीसगड विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी झालेलं मतदान ७ आणि १७ नोव्हेंबरला घेण्यात आलं. आता उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असून आज कुणाचा विजय होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

या निवडणुकांकडे मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे विजयासाठी भाजपसह काँग्रेसने आपली पूर्ण ताकद पणाला लावून दिली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *