४४२२८ पदांसाठी ग्रामीण डाक सेवक पदांची भरती, १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी
इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवकाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.
इंडिया पोस्टने विविध सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकांची बंपर भरती जारी केली आहे. आज 15 जुलैपासून 44 हजार 228 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीशी संबंधित अधिसूचना https://indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 15 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 या कालावधीत ग्रामीण डाक सेवकाच्या पदांसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
मान्यताप्राप्त मंडळातील 10 वी उत्तीर्ण उमेदवार इंडिया पोस्ट GDS च्या या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना ते ज्या प्रदेशातून अर्ज करत आहेत तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
ग्रामीण डाक सेवक(GDS) या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठीही सूट देण्याची तरतूद आहे. 5 ऑगस्ट 2024 रोजी वयाची गणना केली जाईल.
अर्ज करताना, सामान्य श्रेणी/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. ग्रामीण डाक सेवकांच्या या भरतीमध्ये उमेदवारांची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना तीन टप्पे पूर्ण करावे लागतील. नोंदणी, अर्ज फॉर्म आणि अर्ज फी भरणे. तिन्ही टप्पे पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी होता येईल.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.