१ एप्रिल,आजपासून महावितरणच्या वीज दरात वाढ,अशी वाढ हाेईल तुमच्या बिलात…
राज्य वीज नियामक आयोगाने राज्यातील वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांसाठी वीजदरात सरासरी 2 टक्क्यांची कपात केली आहे. मात्र टाटा पॉवर वीज वितरण कंपनीच्या विजेच्या दरात वाढ होणार आहे. 1 एप्रिलपासून राज्यात नवीन वीजदर लागू होणार आहेत.
राज्य वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील वीज ग्राहकांचे वीजदर जाहीर केले आहेत. 2020 – 21 ते 2024 – 25 या कालावधीत वीजदर आकारणीबाबतचा आदेश आयोगाने जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्याने ग्राहकांकडून वीजबिलात सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आयोगाने महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना 1 एप्रिल 2021 पासून वीजबिलात सरासरी 1 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महावितरणच्या घरगुती ग्राहकांना वीज वापरासाठी आता प्रत्येक युनिटमागे 7.58 रूपये मोजावे लागतील.
आजपासून वीजबिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.
वीज दरवाढीचा फटका घरगुती ग्राहकांसोबतच उद्योग, कृषी आदी संवर्गातील वापरकर्त्यांना बसणार आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर, खाद्य तेल आदी जीवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या भरमसाठ वाढीमुळे नागरिक महागाईने आधीच हवालदिल आहेत. असे असताना महावितरणकडून स्थिर आकार, इंधन समायोजन आकार आदी शुल्क वसूल करून नागरिकांची लूट सुरू असल्याचा आरोप वीज ग्राहक संघटनांनी केला.
घरगुती ग्राहक सध्याचे दर- (२०२३-२४)- नवीन दर (२०२४-२५)
० ते १०० युनिट -५.५८ प्रति युनिट- ५.८८ प्रति युनिट
१०१ ते ३०० युनिट- १०.८१ प्रति युनिट- ११.४६ प्रति युनिट
३०१ ते ५०० युनिट- १४.७८ प्रति युनिट- १५.७२ प्रति युनिट
