अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

१०० पटाच्या विद्यार्थीसंख्येला मुख्याध्यापकपद ग्राह्य धरणार, शालेय शिक्षणमंत्री यांच्या बैठकीत निर्णय

Share this post

राज्यातील शाळांत असलेल्या 150 विद्यार्थी ऐवजी 100 पटाच्या विद्यार्थिसंख्येला मुख्याध्यापकपद ग्राह्य धरण्याबरोबरच पायाभूत पदांना संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी घेतला. मंत्री केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील चर्नीरोड येथील जवाहर बालभवन येथे बैठक झाली. या बैठकीत 15 मार्च 2024 च्या संच मान्यता शासन निर्णयात सुधारणा करणे यासह विविध प्रश्नांवर चर्चा होऊन अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारती राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.

शासनाने 15 मार्च 2024 रोजी काढलेला संच मान्यता आदेश हा बर्याच शाळांना मारक ठरणारा आहे. या आदेशामुळे मुख्याध्यापक पद तसेच शाळेतील शिक्षकांची पदे कमी होणार असून याचा मराठी माध्यमांच्या शाळांना मोठा फटका बसणार आहे. या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. त्यामुळे याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली.

मुख्याध्यापक पदासाठी 150 पट संख्येऐवजी 100 पट संख्या गृहीतधरून मुख्याध्यापकपद मान्य केले जाईल, तसेच मुख्याध्यापकपद रद्दझाल्यास त्या पदाला संबंधित मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत किंवापटसंख्या वाढ होईपर्यंत संरक्षण दिले जाईल, अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश केसरकर यांनी दिले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *