अपडेटमुंबईविशेष

हेमंत भास्कर मोरे यांचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मान…

Share this post

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार समारंभ वासुदेव बळवंतर फडके नाट्यगृह पनवेल नवी मुंबई येथे संपन्न झाला.

या पुरस्कार समारंभात हेमंत भास्कर मोरे यांचे संघटनात्मक व सामजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत, आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

हेमंत मोरे यांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर ते आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, उपक्रमशील शिक्षक अशी देखील त्यांची ओळख आहे. त्याच सोबत प्रहार न्यायमंच संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव पदावर ते कार्यरत आहे, संघटनेच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक प्रश्न त्यांनी मार्गी लावली आहेत. ते निसर्ग प्रेमी असून वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन व संरक्षण यासाठी विविध उपक्रम ते राबवतात. सीड बॉल कॅम्पेनच्या माध्यमातुन हजारो सीड बॉलचे रोपण शहराच्या ओरलगतच्या परिसरात आपल्या टीमच्या मदतीने करत असतात. बऱ्याच सामाजिक कार्यात ते सक्रीय सहभाग घेऊन कार्य करतात. अश्या त्यांच्या विविध कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.

या पुरस्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंगआप्पा बारणे, लोकनेते रासामाजिक कार्यात ते सक्रिय सहभाग घेऊन मशेठजी ठाकूर, आमदार प्रशांतजी ठाकूर, झी २४ तास न्यूजचॅनलचे संपादक निलेश खरे, दै. महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉ. दिपक दळवी, भारतीय पत्रकारचे संघाचे अध्यक्ष सुनीलजी सोनवणे, इंजिनिअर विवेकजी देशपांडे, ॲड. मंगेश विश्वनाथ नेने हे उपस्थित होते.

तर अलबत्या गलबत्या या लोकप्रिय नाटकातील चिंची चेटकिनीची मध्यवर्ती भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते निलेश गोपनारायण व मिसेस इंडिया इंटरनॅशनल दबई येथील विजेत्या डॉ.शुभदा जगदाळे यांची विशेष उपस्थिती होती.

पत्रकारांसह विविध क्षेत्रात आपल्या कार्याचाठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये रायगड जिल्ह्याचे लोकनेते मा.रामशेठजी ठाकूर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.

मिळालेला पुरस्कार सर्वांचा विश्वास व आशिर्वादाचे फळ आहे व लोकांच्या विश्वासामुळेच चांगले काम करायला नव ऊर्जा मिळते असे हेमंत भास्कर मोरे यांनी सांगितले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *