अपडेटइतरराष्ट्रीय

हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही,वाहतूकदारांचा संप अखेर मागे…

Share this post

केंद्रीय गृह सचिव आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची बैठक पार पडली. हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही अंस आश्वासन केंद्र सरकारने माल वाहतूकदारांना दिले आहे. केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचं वाहतूकदार संघटनेने आवाहन केले. नवा कायदा लागू होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका वाहतूकदारांनी मांडली.

हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला होता. देशभरात मोठ्या वाहनांचे चालक संपावर गेले. रस्ते अडवून कायद्याची अंमलबजावणी न करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासोबत मंगळवारी गृहमंत्रालयात परिवहन संघटनेची बैठक झाली. या बैठकीत हिट अँड रन कलम तूर्तास लागू न करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने संप मागे घेण्याचे मान्य केले आहे.

नव्यानं तयार करण्यात आलेल्या ‘हिट अँड रन’ कायद्याचा कलम 104 मध्ये समावेश करण्यात आला आहे. कलम 104 (अ) नुसार चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास, चालकाला जास्तीत जास्त 7 लाखांचा दंड ठोठावला जाईल. कलम 104 (ब) नुसार अपघात झाला आणि वाहनाला धडक दिल्यानंतर, चालक स्वतः किंवा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होवू शकते. यालाच वाहन चालकांचा विरोध आहे.

मालवाहतूकदारांचा संप अखेर मिटला आहे. हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही असं आश्वासन केंद्र सरकारचं माल वाहतूकदारांना दिले आहे. सरकार संपावर तोडगा काढण्यात यशस्वी झाले आहे. या संपाचे पडसाद संपूर्ण देशभरात पहायला मिळाले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *