क्रीडाअपडेटराष्ट्रीय

हार्दिक पंड्या World Cup मधून बाहेर…

Share this post

हार्दिक पंड्या वर्ल्ड कपच्या सामन्यात चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये जखमी झाला होता.

19 ऑक्टोबर रोजी पुण्यात झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये हार्दिक पंड्या जखमी झाला. बांगलादेशविरोधातील सामन्यात आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती.

त्यानंतर हार्दिक पांड्यावर उपचार सुरु करण्यात आले. तो पुढील काही सामने खेळणार नाही असं आधी सांगण्यात आलं होतं. मात्र आज तो संपूर्ण स्पर्धेमधूनच बाहेर पडला असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्या जागी भारतीय संघामध्ये वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *