अपडेटआंतराष्ट्रीयआरोग्य

हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेलेल्या जगभरातील 550 यात्रेकरूंचा उष्णतेमुळे मृत्यू

Share this post

‘हज’ यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेलेल्या जगभरातील 550 यात्रेकरूंचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकूण मृत पावलेल्या लोकांपैकी 323 इजिप्त या देशातील यात्रेकरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या मक्केत उष्णतेचा पारा 52 अंशावर जाऊन पोहोचला आहे. ‘हज’ यात्रेसाठी जगभरातील यात्रेकरू हे सौदी अरेबियाला जातात. त्यामुळे चेंगराचेंगरीबरोबरच उष्माघातासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असतात.

या सर्वांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे तसेच मृतांपैकी किमान 60 जण जॉर्डन देशातील होते. तर इंडोनेशिया, इराण आणि सेनेगल या देशातील नागरिकांचा समावेश आहे. परंतु अजून काही देशांनी मृतांची आकडेवारी जाहीर केली नाही. दरम्यान गेल्या वर्षी हजयात्रेमध्ये विविध देशांतील सुमारे 240 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश नागरिक इंडोनेशियातील होते.

दरवर्षी हजारो यात्रेकरू पैसे वाचवण्यासाठी हज यात्रेचा अधिकृत व्हिसा न घेता जात असतात. त्यामुळे त्यांना सौदीच्या प्रशासनाकडून योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. आणि त्याचा त्रास सहन करावा लागतो. या वर्षी सुमारे 18 लाख यात्रेकरू हज यात्रेमध्ये सहभागी झाले असून त्यापैकी 16 लाख यात्रेकरू परदेशी आहेत.

मक्का बाहेरील मिना शहरात यात्रेकरूंची बिकट परिस्थिती असल्याची माहिती तेथील पत्रकारांनी दिली आहे. यात्रेकरू शरीर थंड ठेवण्यासाठी डोक्यावर डोक्यावर पाणी ओतत आहे. तसेच यात्रेकरूंना उष्णतेचा त्रास कमी व्हावा यासाठी स्वयंसेवक थंड पेय आणि आईस्क्रीम देत आहेत. तर सौदी अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे, पुरेसे पाणी प्यावे आणि दिवसाच्या सर्वात उष्णतेच्या वेळी सूर्यप्रकाशाचा संपर्क टाळावा. असं आवाहन करण्यात आले आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *