अपडेट

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १०००हून अधिक पदांची भरती

Share this post

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नुकतेच भरतीची अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार बँकेत तब्बल १ हजार ३० पदांची भरती घेण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पात्र आणि इच्छुकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या भरती मोहिमेद्वारे, बँक व्हीपी वेल्थ रेग्युलरच्या ६०० जागा, रिलेशनशिप मॅनेजर एआरएम रेग्युलरच्या १५० जागा, रिलेशनशिप मॅनेजर एआरएम बॅकलॉगच्या १२३ जागा, व्हीपी वेल्थ बॅकलॉगच्या ४३ जागा, इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट रेग्युलरच्या ३० जागा, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर बॅकलॉगच्या २६ जागा, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर रेग्युलरच्या २३ जागा, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड रेग्युलरच्या ११ जागा, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड बॅकलॉगच्या ११ जागा भरल्या जातील.

त्याचबरोबर रिजनल हेड बॅकलॉगच्या ४ जागा, रिजनल हेड रेग्युलर, सेंट्रल रिसर्च टीम (प्रोजेक्ट लीड) रेग्युलर, सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) रेग्युलर व प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस) रेग्युलरसाठी प्रत्येकी २ जागांची भरती केली जाणार आहेत. तसेच, मोहिमेद्वारे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर रेग्युलरसाठी एक जागा भरली जाईल.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *