सौर उर्जेवर चालणारी जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार
नेदरलॅन्डच्या एन्धोवेन तांत्रिकी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार विकसीत केली आहे. विद्यार्थ्यांनी विकसीत केलेली ‘स्टेला’ ही जगातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार ठरली आहे. ही कार संपुर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी असून यात चार माणसे बसण्याची व्यवस्था आहे.
सौरऊर्जेच्या माध्यामातून संपुर्णपणे बॅटरी प्रभारित झाल्यानंतर ही कार ६०० किलोमीटर अंतर पार करु शकते असा अंदाज आहे. प्राथमिक तत्वावर स्टेला कारची चाचणीही करण्यात आली आहे.
‘स्टेला’कारच्या वरच्या भागावर सौरऊर्जा ग्रहण करणाऱया धातूचे आवरण देण्यात आले आहे. यामार्फत ग्रहण केली जाणारी ऊर्जा कारच्या बॅटरीमध्ये साठविली जाते त्यातून कारला ऊर्जाप्राप्त होते.