अपडेटशैक्षणिकहिंगोली

सीईओंच्या दालनात विद्यार्थ्यांनी भरवली शाळा…

Share this post

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सीईओच्या दालनात शाळा भरवली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले गाऱ्हाणे सीईओ समोर मांडले.

जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था बिकट होत चालली आहे. शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या हा गंभीर विषय आहे. तर काही शाळांवर विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी असताना त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याचे देखील चित्र पाहण्यास मिळते.तर काही शाळांवर विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी असताना त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याचे देखील चित्र पाहण्यास मिळते.

हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक नाही. यामुळे विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले होते. यामुळे आज शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेत येत सीईओंच्या दालनातच आंदोलन सुरु केले.

विद्यार्थ्यांनी सीईओंच्या दालनात आंदोलन करत शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्हा परिषद कार्यालयात बे एक बेचा पाढा म्हणण्यास सुरवात केली. चिमुकल्याच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी तातडीने शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिला आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *