अपडेटदुर्घटनाशैक्षणिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गमध्ये नवोदय विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा,रुग्णालयात उपचार सुरू…

Share this post

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर यानंतर अधिक प्रकृती खालावल्याने १३ विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर मुलांना हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच सरपंच लवू भिंगारे यांनी धाव घेत या मुलांना भरती करायला सुरुवात केले. पालकांसह विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी कुटीर रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार नवोदय विद्यालयात तब्बल ४३८ विद्यार्थी हे शिकत आहे. काही विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे. रात्री नऊ वाजता हे विद्यार्थी जेवण करून झोपी गेले. मात्र या जेवणातील भाजी खराब होती. ती खाल्ल्याने या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आणी पहाटे तीन-चार वाजल्यापासून उलट्या आणि जुलाब सुरू झाले. शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्यांना सकाळी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र काही विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळत असल्याने अखेर त्यांना सावंतवाडी येथील कुटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना घडूनही पालकांना कुठलीच सूचना शाळा प्रशासनाने दिली नाही. त्यामुळे सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल होताच पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जेवणात वापरलेल्या भाजीतून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले असून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. सांगेलीतून तब्बल तेरा विद्यार्थ्यांना सावंतवाडी कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही विद्यार्थी हे सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत. त्याठिकाणी पालक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *