सावधान…चीन भारतीयांना खाऊ घालतोय विषारी लसूण.
चीन हा लसणाची निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. मात्र चीनमधील या लसणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चीनने चक्क बनावट लसूण तयार करत आहे की काय अशी शंका घेतली जात आहे. सध्या सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये चीनमधून निर्यात केल्या जाणाऱ्या ‘बनावट लसणा’संदर्भात इशारा देण्यात आला आहे. बाजारात विकला जाणारा हा बनावट लसूण भारतामधील कोट्यवधी घरांमध्ये खाल्ला जात असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. हा लसूण दिसायला फारच पांढरा आणि ताजातवाना दिसतो. मात्र आरोग्यासाठी हा लसूण धोकादायक ठरु शकतो. नाल्यातील पाण्याचा वापर करुन या लसणाची लागवड केली जाते. लीड आणि अन्य धातू कणांच्या माध्यमातून लसणाची वाढ अधिक मोठी व्हावी यासाठी त्याला अस्वच्छ पाणी दिलं जातं. हा लसूण अधिक पांढरा दिसावा यासाठी क्लोरीनचा वापर केला जातोय.
अमेरिकेतील एका खासदाराने चीनमधून लसूण आयात करणं हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे यासंदर्भात सरकारने तपास करावा अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन सीनेट रिक स्कॉट यांनी वाणिज्य सचिवांना लिहिलेल्या पत्रामध्ये आयात केल्या जाणाऱ्या लसणाचं अयोग्य पद्धतीने उत्पादन घेतलं जात असल्याचा संदर्भ देत चिनी लसूण असुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.
चीन हा लसणाची निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. मात्र लसणाच्या व्यापारावरुन अनेकदा वाद झाले आहेत. आता सीनेट रिक स्कॉट यांनी लसणाच्या वेगवेगळ्या प्रजातींबद्दल सविस्तरपणे माहिती देताना या लसमाच्या दर्जासंदर्भात अमेरिकेने सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
तुमच्या घरात चीनमधील बनावट लसूण आहे की नाही हे तपासून पाहायचं असेल तर हे फार सोपं आहे. बाजारात विकला जाणारा बनावट लसूण हा अधिक पांढरा असतो. या लसणावर कोणत्याही प्रकारचे डाग नसतात. या लसणाच्या खालील भागावर डाग दिसून आले तर हा लसूण चिनी नाही असं समजावं. जर हा लसूण बुडालाही अगदी पांढरा असेल तर हा चिनी लसूण आहे असं समजावं.
