सानिया मिर्झा ने शोएब मलिकला ‘तलाक’ नाही तर ‘खुला’ दिलाय…
माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यांचे १४ वर्षे जुने वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. दोघांना पाच वर्षांचा मुलगाही असून तो सानिया मिर्झासोबत राहतो. दोघांनी २०१०मध्ये लग्न केले. सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी सांगितले की, सानियाने ‘खुला’ घेतला आहे आणि शोएबपासून वेगळे झाली आहे.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकने २०१० मध्ये लग्न केलं होतं. दोघांनी १४ वर्ष एकमेकांसोबत संसार केला. परंतु शोएब मलिकने तिसरं लग्न केल्याने त्यांचा संसार तुटलाय. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. शोएबने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून लग्नाची माहिती दिली. यानंतर सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पुष्टी केली की, सानियाने खुला स्वीकारली असून ती शोएबपासून विभक्त झाली आहे.
खुला म्हणजे काय जाणून घेऊया…
तलाख आणि ‘खुला’ यात फारसा फरक नाही. इस्लामिक मान्यतेनुसार जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेते, तेव्हा त्याला ‘खुला’ म्हणतात. त्याच जागेवर जेव्हा पती हा निर्णय घेतो तेव्हा त्याला ‘तलाक’ म्हणतात. घटस्फोटानंतर महिला सतत ३ महिने पतीच्या घरी राहते. मात्र ‘खुला’ घेतल्यानंतर महिलेला पतीचे घर त्वरित सोडावे लागते. कुराण आणि हदीसमध्ये खुलाचा उल्लेख आढळतो.
खुल्याबाबत आणखी एक गोष्ट म्हणजे ती स्त्री तिच्या पतीला सांगते की, तिला खुला घ्यायचा आहे आणि पती त्याला सहमत असेल खुला होता. पण जर पतीने नकार दिला तर ती स्त्री काझीकडे जाऊ शकते आणि तो खुला मागू शकते. तिला खुला का हवा याचं कारण देऊ ती खुला घेऊ शकते. यानंतर कारणे जाणून घेतल्यानंतर काझी हे खुला देत असतात. इस्लाम धर्मात काझींना जोडप्याचं संबंध संपवण्याचा अधिकार आहे. यानंतर हे नाते संपुष्टात येते.
‘खुला’ दिल्यानंतर महिला तिच्या इच्छेनुसार निकाह करू शकते. यासाठी तिला एक महिना प्रतीक्षता करावी लागते. खुला दिल्याच्या तारखेपासून तिला एक महिना थांबल्यानंतर ती दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू शकते.
