सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रक्कमेसाठी, सेवानिवृत्त शिक्षकांचे महानगरपालिका प्रवेशव्दारावर डफ वाजवून आंदोलन…
धुळे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाच्या ५० टक्के थकीत फरकाच्या रकमा अद्याप मिळालेल्या नाहीत. म्हणून आज मनपाच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी सहकुटूंब महानगरपालिका प्रवेशव्दारावर डफ वाजवून आवाज सुनो आंदोलन केले.
सेवानिवृत्त शिक्षकांनी वारंवार मागणी करून देखील थकीत वेतनाचा फरक देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली नाही. यामुळे आजचे आंदोलन करण्यात आले असून हे थकीत रक्कम लवकरात लवकर मिळावे यासाठी या आंदोलन आंदोलन तर्फे करण्यात येत आहे. जोपर्यंत थकीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत दररोज सकाळी हे आंदोलन केले जाईल, अशा इशारा यावेळी आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे.
