महाराष्ट्रतंत्रज्ञानराष्ट्रीय

सातबारा मिळणार आता मोबाइल ॲपवर…

Share this post

सातबारा आता मोबाइल ॲपवर सहज उपलब्ध होणार आहे.

महसूल विभागाने महाभूमी संकेतस्थळावर सर्व नागरिकांसाठी आता डिजिटल सातबारा उपलब्ध केला आहे. हि सुविधा केंद्र सरकारच्या उमंग मोबाइल ॲपवरही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात फेऱ्या मारल्याशिवाय सातबारा आता मोबाइल ॲपवर सहज उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारचे उमंग हे मोबाइल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून घेऊन आपण त्याचा वापर करू शकता. राज्यातील जवळपास अंदाजे तीन कोटी सातबारा यावर उपलब्ध असतील. महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या पोर्टलवर उतारे उपलब्ध आहेत. 
महाभूमी या सरकारच्या अधिकृत पोर्टलवर सातबारा उतारा ८ अ उपलब्ध होईल. या पोर्टलवर पंधरा रुपयांत सातबारा उतारा मिळेल. यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी सातबारा उताऱ्याची प्रत मिळविण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा झेरॉक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता.

पोर्टलवर ही सुविधा केवळ १५ रुपयांत देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी उमंग मोबाइल ॲपवर डिजिटल स्वरूपात उतारा मिळणे सहज शक्य झाले आहे, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे. ( अॅप लिंक मुख्य संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *