अपडेटअहमदनगरदुर्घटना

सांदण दरी पाहायला गेलेली तरुणी पाय घसरून खाली कोसळली,जागीच मृत्यू…

Share this post

सांदण दरी पाहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटक तरुणीचा मृत्यू झालाय. दरी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक तरुणीचा पाय घसरला आणि ती खाली पडली. यात तिचा जागीच मृत्यू झालाय. सदर घटनेमुळे परिसरात एकखच खळबळ उडालाये.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 चा सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. ऐश्वर्या खानविलकर (24 वर्षीय) असं या मृत मुलीचं नाव आहे. तरुणी आपल्या मित्रपरीवारासह पर्यटनासाठी आली होती. रविवारची सुट्टी आणि सोमवारी जोडून ख्रिसमसची सुट्टी असल्याने तरुणी आणि तिच्या मित्रांनी बाहेर फिरण्याचा प्लान केला होता.

ऐश्वर्यासह चार तरुणी सकाळीच साडे सहा वाजता मुंबई येथून भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी आल्या होत्या. भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर चौघीजणी सांदण दरी पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या ग्रुपमधील ऐश्वर्या खानविलकरचा एका खडकावरुन पाय घसरला. त्यामुळे ती दहा ते पंधरा फूट खाली पडली. खाली पडल्यामुळे ऐश्वर्याचे डोकं थेट खडकावर आपटलं. यामुळेच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.ती पडली त्यावेळी तिच्या आजुबाजूला तिला पटकन सावरण्यासाठी कोणीच नव्हतं. त्यामुळे ती दरीत कोसळली. बऱ्याच उंचावरून दरीत पडल्याने तिच्या हातापायांना तसेच डोक्याला मोठा मार लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन आता वनविभागासह पोलिस प्रशासनाने केलं आहे. पर्यटनस्थळी नेहमीच अशा घटना घडत असतात. अशावेळी प्रवास करताना आणि निसर्गाचा आनंद लुटताना प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे जरी दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा केल्यास व्यक्तींचा जीव जातो.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *