सहलीदरम्यान शिक्षकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग,सरकारवाडा पोलिसात ॲट्रोसिटी, पोक्सोअन्वये गुन्हा दाखल…
नाशिक शहरातील एका शाळेची सहल बाहेरगावी गेली असता, यादरम्यान बसमध्ये पीडित मुलींच्या बाजुला बसून बसच्या खिडकीतून बाहेर थुंकण्याच्या बहाण्याने संशयित शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित शिक्षकाविरोधात पोक्सो, ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित संस्थेने संशयित शिक्षकाला तत्काळ निलंबित केले आहे.
कॅनडा कॉर्नर परिसरातील एका शाळेची शैक्षणिक सहल ५ जानेवारी रोजी मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे गेली होती.काही विद्यार्थीनी बसच्या खिडकीजवळ बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होते. सायंकाळच्या जेवणानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. या दरम्यान मध्यरात्री दोन ते सहा वाजेच्या दरम्यान, संशयित सानप याने पान खाल्ले होते. ते खिडकीतून बाहेर थुंकण्यासाठी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थिनींच्या शेजारी जाऊन बसला.
यावेळी त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न हाईल, असे कृत्य करीत विनयभंग केला. पीडित मुली घरी आल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी ही बाब कुटुंबास आणि इतर शिक्षकांना सांगितली. त्यानंतर शालेय व्यवस्थापनाने प्रकरणाची चौकशी करत सानप यास निलंबित केले.
यापकरणी सरकारवाडा पोलिसात सानपविरोधात गुन्हा दाखल झाला असून या गंभीर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
