अपडेटक्राईममुंबई

सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर आज सकाळी गोळीबार, या गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदरी…

Share this post

सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर आज सकाळी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली. हा गोळीबार कोणी केला असेल असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांना पडला आहे. या गोळीबारानंतर पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी जाऊन अधिक तपास सुरु करत आहेत. त्याच दरम्यान आता अखेर एका गँगस्टरने सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. हा गँगस्टर दुसरा तिसरा कोणी नसून लॉरेंस बिश्नोई चा भाऊ अनमोल बिष्णोई हा आहे.

अनमोल बिष्णोईने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदरी घेतली आहे तसेच सलमानला अजून धमकावलं आहे. अनमोल आपल्या पोस्ट मध्ये म्हणतो, “ओम जय श्री राम, जय गुरुजी जंभेश्वर, जय गुरु दयानंद सरस्वती, जय भारत. आम्हाला शांतता हवी आहे. दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून घेतला जात असेल, तर युद्ध योग्य आहे. सलमान खान, आम्ही हे फक्त ट्रेलर दाखवण्यासाठी केले आहे, जेणेकरुन तुला आमची ताकद कळेल. हेच नाही तर आम्ही तुला ही शेवटची वार्निंग देतो यानंतर या गोळ्या फक्त घरावर चालणार नाहीत असेही या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. तू दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना देव मानले असेल पण आम्ही त्यांच्या नावाची २ कुत्रे पाळली आहेत. बाकी आम्हाला जास्त काय बोलायची आवश्यकता नाही असं म्हणत अनमोल बिष्णोईने सलमानला पुनः एकदा धमकीवजा इशारा दिला आहे.

सलमान खानच्या घराबाहेर या गोळीबारामागे बिष्णोई गॅंग असण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात आहे, कारण यापूर्वी सुद्धा सलमानला बिष्णोई गॅंगकडून सातत्याने धमक्या देण्यात येत होत्या. 2022 मध्ये सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना एक चिठ्ठी द्वारे धमकी देण्यात आली होती. यामध्ये ‘मुसेवाला जैसा कर देंगे’, असं लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. त्यानंतर त्याला बिष्णोई गॅंग कडून धमक्यांचे सत्र सुरूच होते. त्यातच आता थेट सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *