अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

सरकारी शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकवला जाणार

Share this post

सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतलाय. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE अभ्यास पॅटर्न राबवला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.

CBSE बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता राज्याचे शिक्षणही दर्जेदार असावे, स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य शिक्षण मंडळाची मुले मागे पडू नयेत, यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE बोर्डाच्या धर्तीवर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला आहे. तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकवला जाईल.

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांची नवी आखणी, वेळापत्रकही बदलणार आहे. शिक्षक संघटनांशी चर्चा करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम लागू होणार आहे.

आपल्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये टाकावे आणि चांगले शिक्षण द्यावे. यासाठी लोक सीबीएससी बोर्डांमध्ये त्यांच्या मुलांना टाकतात. परंतु, आता राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, स्पर्धा परीक्षांमध्ये मुले मागे पडू नये. यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत अभ्यासक्रम देखील निश्चित करण्यात आलेला आहे. आणि पुढील वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये हा सीबीएससी पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *