अपडेटआर्थिकराष्ट्रीय

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बातमी,जनरल प्रोव्हिडंट फंडाचे व्याजदर जाहीर…

Share this post

१ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत, जीपीएफ आणि इतर तत्सम फंड्सवर ७.१ टक्के व्याज दिलं जाईल. जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीसाठी सरकारनं जीपीएफ आणि तत्सम लिंक्ड फंडांवरील व्याजदरात बदल केलेला नाही.

अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानुसार (DEA) २ जानेवारी, २०२४ रोजी, २०२३-२४ या वर्षातील सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि तत्सम फंड्सवर १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत ७.१ टक्के दरानं व्याज दिलं जाईल. सरकारनं गेल्यावेळेप्रमाणेच यंदाही व्याजदर कायम ठेवले आहेत. जीपीएफवर पीपीएफ प्रमाणेच व्याज मिळत आहे. जीपीएफ दर हे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) दरांसारखेच असतात. सर्व फंडांवर ७.१ टक्के दरानं व्याजही मिळेल.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *