या सरकारने आणली लाडली लक्ष्मी योजना, मुलींना मिळणार 1 लाख रुपयांचा लाभ
मध्य प्रदेश सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी लाडली लक्ष्मी योजना आणली आहे.मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. यात सरकारकडून १,४३,००० रुपये दिले जातात. या योजनेत मुलींना इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी २००० रुपये दिले जातात. इयत्त ९वीत प्रवेश घेण्यासाठी ४००० रुपये दिले जातात. अकरावीत प्रवेश घेण्यासाठी ६००० रुपये दिले जातात.तर बारावीत प्रवेश घेण्यासाठी ६ हजार रुपये दिले जातात.या योजनेत मुलींना दहावीनंतर किंवा १२ वी नंतर इतर व्यावसायिक कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना २५,००० रुपयांची मदत केली जाते. हे पैसे दोन हप्त्यांमध्ये दिले जातात.याचसोबत जर मुलींना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना आर्थिक मदत केली जाते.मुलींचे २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे १ लाख रुपयांची मदत केली जाते.
या योजनेत तुम्ही मुलीच्या नावानेच बँकेत खाते उघडू शकता. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर अर्ज करावी लागेल. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, बँकेचे कागदपत्र आणि फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.